BFI

स्त्रीरोगशास्त्र

स्त्रीरोगशास्त्र ही स्त्रिया आणि मुलींमध्ये होणाऱ्या आजारांशी, विशेषत: त्यांच्या प्रजनन प्रणालीवर परिणाम करणाऱ्या आजारांशी संबंधित असलेली वैद्यकीय विज्ञानशाखा आहे.

आमचे तज्ज्ञ तुमची गोपनीयता आणि सोयीचे भान राखत तुमच्या सर्व स्त्रीरोगविषयक समस्यांसाठी तुम्हाला सहज मदत करू शकतात.

रक्तस्त्रावाची समस्या

अत्याधिक रक्तप्रवाह, वेदनादायक मासिक पाळी इ. पाळीशी संबंधित सर्व समस्यांचे निदान करण्यासाठी आम्ही 3-डी अल्ट्रासाऊंड आणि इतर वैशिष्ट्यीकृत चाचण्या प्रदान करतो. शस्त्रक्रिया टाळण्यासाठी इच्छुक असणाऱ्या रूग्णांना जास्तीत जास्त सानुकूलित नॉन-सर्जिकल उपचाराचे पर्याय उपलब्ध करवून दिले जातात.

कमीतकमी अस्वस्थता आणि वेगवान पुनर्प्राप्तीसाठी लॅपरोस्कोपिक हिस्टेरेक्टॉमी, फायब्रॉइड काढणे आणि इतर शस्त्रक्रिया पुरवल्या जातात.

योनी शस्त्रक्रिया

योनी शस्त्रक्रियेचा फायदा असा आहे, की या शस्त्रक्रियेत कोणत्याही प्रकारचे व्रण तयार होत नाही. योनीमार्गातच संपूर्ण प्रक्रिया होत असल्याने उदराच्या भागात व्रण पडत नाही. त्यामुळे योनीमार्गे केली जाणारी हिस्टेरोक्टोमी (गर्भाशयाचे काढून टाकणे) अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. आमच्या तज्ज्ञांचे कौशल्य आणि उत्तम दर्जाचे ओटी आणि ऑपरेशननंतरच्या सुविधा सर्वोत्तम परिणाम प्रदान करतात.

रजोनिवृत्ती क्लिनिक

अचानक मनःस्थिती बदलणे आणि ताप येण्याच्या समस्यांवर पूर्णपणे उपाय मिळवणे प्रत्येकाला शक्य नसते. आम्हाला तुमच्यासाठी हे संक्रमण व्यवस्थित करू द्या.

स्त्रीचे स्तन

जसे तुमचे वय वाढत जाते, त्यानुसार स्तनांची काळजी घेणे आणि संभाव्य कर्करोगाचा लवकर शोध घेणे महत्वाचे आहे. स्तनाचा कर्करोग हा जगभरातील महिलांमध्ये सर्वात सामान्य कर्करोग आहे. या समस्येचे स्वतःहून परीक्षण कसे करायचे याविषयी आमची टीम तुम्हाला मार्गदर्शन करेल. आम्ही तुम्हाला  तुमच्या वैद्यकीय गरजांनुसार नियमित स्क्रीनिंग आणि मॅमोग्राफी किंवा सोनोग्राफीद्वारे संबंधित रोगाला आधीच शोधण्यात मदत करू.

वाढवणे (आकार वाढविणे) आणि कमी करणे यांसारख्या स्तनावरील कॉस्मेटिक शस्त्रक्रिया देखील आम्ही प्रदान करतो.

यूरोगायनॅकॉलॉजी

काही मूत्र समस्यांचे मूळ गर्भाशयाची रचना आणि कार्य, योनी आणि सहाय्यक संरचनांमध्ये असू शकते. या समस्यांना सामोरे जाण्यासाठी आमच्याकडे उत्कृष्ट उपकरण संरचना उपलब्ध आहे.

ऑन्कोलॉजी

स्त्रियांमध्ये कर्करोगाचा सर्वात सामान्य प्रकार म्हणजे ‘स्त्रीरोग कर्करोग’ होय. यासंदर्भात, चांगली बाब म्हणजे याचे आधीच निदान करणे शक्य आहे.

आमच्याकडे तुमच्या नियमित तपासणीचे नियोजन करण्यासाठी विसरू नका आणि संपूर्ण उपचार मिळवा.

कॉस्मेटिक गायनॅकॉलॉजी

महिलांच्या आरोग्यासाठीची ही सर्वात वेगाने विकसित होणारी उपचार शाखा आहे. या उपचार प्रक्रियेत अंडाशय व योनी क्षेत्राचा देखावा आणि लैंगिक कार्य सुधारण्याचा समावेश आहे. सर्वसामान्य समजुतीच्या उलट, विज्ञान पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या गरजा आणि इच्छेनुसार चालते. उत्तम लैंगिक आत्मविश्वासामुळे एकूणच सर्वांगीण विकास होऊ शकतो आणि मनःस्थिती सुधारू शकते. यामधील सामान्य उपचार प्रक्रिया म्हणजे, हायमेनोप्लास्टी (सायकलिंग इजा किंवा लैंगिक संभोगाद्वारे हायमेन खंडित होणे), पीआरपी इंजेक्शन आणि जी-स्पॉट वर्धित करणे, योनी घट्ट करण्यासाठी वेजिनोप्लास्टी, योनीच्या मुखाचा आकार कमी करण्यासाठी लॅबियाप्लास्टी इ.

बाविशी फर्टिलिटी इन्स्टिट्यूटचे फायदे

आम्ही आयुष्याच्या सर्वच टप्प्यांतील महिलांच्या आरोग्याची काळजी घेतो आणि किशोरावस्थेपासून रजोनिवृत्तीपर्यंत सर्वसमावेशक, अगदी जवळून आणि उच्च-गुणवत्तेची वैद्यकीय सेवा पुरवतो. जेव्हा शक्य असेल, तेव्हा आम्ही शस्त्रक्रियाविरहित पद्धतींवर लक्ष केंद्रित करतो. तुम्हाला आमच्याकडे शल्यक्रियेसाठी तसेच शस्त्रक्रियाविरहित उपचारांसाठी नवीनतम पिढीतील उपकरणांचा लाभ मिळतो.

आमचे स्थान

    Book an Appointment

    Your family building is just your decision away. Reach us NOW, fill this form and we will respond ASAP, Together, we will succeed.