BFI

आमचा इतिहास

बाविशी फर्टिलिटी इन्स्टिट्यूटया नावाचा संबंध एकता सातत्य या गुणांनी जुळून असलेल्या सदस्यांच्या एका कुटुंबाशी आहे. फर्टिलिटी संबंधीत सर्वोत्तम उपचारांचे ठिकाण म्हणून लोक बाविशी फर्टिलिटी इन्स्टिट्यूटवर विश्वास ठेवतात. भारतातील अनेक मोठ्या शहरांमध्ये स्थित असलेल्या बीएफआयकडे जागतिक दर्जाच्या फर्टिलिटी उपचारासाठीची सर्व आवश्यक उपकरणे कौशल्ये उपलब्ध आहेत

एका छोट्याशा सुरुवातीपासून तर भारतातील सर्वोत्कृष्टपर्यंत

सन १९८६ पासून तर आजपर्यंत आम्ही केलेल्या कामगिरींपैकी काही उल्लेख कामगिरींचा संक्षिप्त आढावा इथे दिला आहे.

सद्यस्थितीत

बीएफआयने हजारों बालकांना आयुष्य प्रदान करण्यात व त्यांना ह्या जगात आणण्यात सहकार्य केले आहे. आपल्या पालकांच्या स्वप्नांना पूर्ण करण्याच्या उद्देशाने ही बालके जन्मास आली आहेत

जागतिक पातळीवर सर्वोत्तम परिणाम दर्शवत आमचे केंद्र प्रत्येक वर्षी ३००० हून अधिक आयव्हीएफ सायकल्स पार पाडतात. फक्त तांत्रिकदृष्ट्याच नवे, तर मानवीय दृष्टीकोनातून आमच्या रुग्णांना बिनशर्त व गुणवत्तापूर्ण सेवा प्रदान करण्यात उत्कृष्टता प्राप्त करणे, हेच आमचे ब्रीद राहिले आहे.

२०२०

भूजमध्ये बाविशी फर्टिलिटी इंस्टिट्यूटची स्थापना.

टाइम्स ऑफ इंडियाच्या फर्टिलिटी क्लिनिक्सच्या राष्ट्रीय सर्वेक्षणात ‘अखिल भारतीय स्तरावर प्रथम क्रमांक’.

टाइम्स ऑफ इंडियाच्या फर्टिलिटी क्लिनिक्सच्या राष्ट्रीय सर्वेक्षणात सलग पाचव्यांदा (२०१६, २०१७, २०१८, २०१९ व २०२० साली) ‘पश्चिम भारतात प्रथम क्रमांक’.

२०१९

वडोदरा शहरात बाविशी फर्टिलिटी इंस्टिट्यूटची स्थापना.

इकॉनॉमिक्स टाइम्सद्वारे ‘बेस्ट आयव्हीएफ क्लिनिक चैन इन इंडिया’ या पुरस्काराने सन्मानित.

२०१८

सुरतमध्ये बाविशी फर्टिलिटी इंस्टिट्यूटची स्थापना.

कलर्स गुजराती वाहिनीवर बीएफआयद्वारे निर्मित ‘देवना दिधेला मांगीने लीधेला’ (Devna Didhela Mangine Lidhela) या दूरचित्रवाणी मालिकेचे प्रसारण. ही टीव्ही मालिका २६ जोडप्यांच्या वास्तविक जीवनातील संघर्षावर व यशावर आधारित आहे.

२०१७

माय एफएमद्वारे ‘एक्सलन्स इन आयव्हीएफ’ने सन्मानित.

युरोपीय वैद्यकीय संघटनेकडून ‘रोझ ऑफ पॅरासेलसस’ पुरस्काराने सन्मानित.

गर्भधारणेविषयी सखोल माहिती देणारे ‘यु मिरॅकल इन मेकिंग’ हे पुस्तक हिंदी, इंग्रजी व गुजराती भाषेत प्रकाशित.

२०१६

कोलकातामध्ये बाविशी प्रतिक्षा फर्टिलिटी इंस्टिट्यूट स्थापन करण्यात आली.

२०१५

आयव्हीएफ इंडियाइडिया टुडे समूहाद्वारे बाविशी फर्टिलिटी इंस्टिट्यूटलापॉवर ब्रँडसन्मानाने गौरविण्यात आले.

२०१४

आमचे संस्थापक डॉ. हिमांशू बाविशी यांचीइंस्टार’ (INSTAR) अर्थातइंडियन सोसायटी फॉर दि थर्ड पार्टी असिस्टेड रिप्रोडक्शनच्या संस्थापक अध्यक्षपदी निवड झाली.

२०१३

व्यापक पातळीवर जनजागृती करण्यासाठी  ‘जनजागृती अभियानआणिपरिवार मिलन हे कार्यक्रम सुरु करण्यात आले. याअंतर्गत हजारों जोडप्यांचे घरपोच समुपदेशन करण्यात आले.

२०१२

वंध्यत्वाशी संबंधित सामाजिक भावनिक पैलूंवर त्यावरील उपायांवर प्रकाश टाकणारेविघ्न दौडहे पुस्तक प्रकाशित झाले.

२०११

बीएफआयचे सीएसआर उपक्रम म्हणून वंध्यता असलेल्या जोडप्यांसाठी ‘दिव्य संतान संस्था’ स्थापन करण्यात आली. वंध्यत्व असलेल्या रुग्णांना आधार देण्यासाठी ‘दिव्य संतान परिवार’ हे समूह गठीत करण्यात आले.

१११ टेस्ट ट्यूब बाळांच्या पालकांच्या वास्तविक जीवनातील अनुभवांना चित्रित करणारे “देवना दिधेला मांगीने लीधेला’ (Devna Didhela Mangine Lidhela) हे पुस्तक संयुक्तपणे इंग्रजी व हिंदी भाषेत प्रकाशित झाले.

२०१०

मुंबईत बाविशी फर्टिलिटी इंस्टिट्यूट स्थापन करण्यात आली.

२००९

व्हिट्रीफाईड पद्धतीने गोठवलेल्या स्त्रीबीजापासून भारतातील पहिल्या जिवंत बाळाला जन्म देऊन बीएफआयने महत्त्वपूर्ण यश संपादीत केले.

देशातील मोठ्या मेट्रो शहरांमध्ये बीएफआयने आपल्या शाखा प्रसारित करण्यास सुरुवात केली.

दिल्लीत बाविशी भगत फर्टिलिटी इंस्टिट्यूट स्थापित झाली.

२००७

विश्वसनीय वीर्य दात्यांच्या सेवार्थ संतान वीर्य बँकसुरु झाली. ही बँक आता संतान एआरटी बँक म्हणून ओळखली जाते. ही आता गुजरात राज्यातील पहिली एआरटी बँक ठरली असून, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) मार्गदर्शिकांचे पालन करणाऱ्या भारतातील थोड्याच वीर्य बँकांपैकी ती एक आहे.

२००६

एंडोस्कोपी एक्सिलन्स इंस्टिट्यूटचा बाविशी फर्टिलिटी इंस्टिट्यूटमध्ये समावेश करण्यात आला.

२००५

बाविशी आयव्हीएफ फर्टिलिटी एंडोस्कोपी क्लिनिकचे नव्या सुविधेत रुपांतर करण्यात आले. परिणामी, “बाविशी फर्टिलिटी इंस्टिट्यूट ही भारतातील सर्वांत मोठी, सर्वांत प्रमुख आणि सर्वांत अत्याधुनिक फर्टिलिटी इंस्टिट्यूट म्हणून नावारूपास आली

२००४

लोकांमध्ये आयव्हीएफच्या संदर्भात असलेल्या भ्रामकता व वाईट दृष्टीकोन दूर करण्याच्या हेतूने टेस्ट ट्यूब बेबी मीट हे जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले. अशाप्रकारचे हे पहिलेच कार्यक्रम होते.

२००२

बीएफआयमध्ये ‘प्रीइंप्लान्टेशन जेनेटिक स्क्रिनिंग अँड डायग्नोसिस (पीजीएसपीजीडी) सुविधेची भर घालण्यात आली. यामुळे बीएफआय हे गुजरात राज्यातील पीजीडी सुविधा पुरवणारे ‘पहिले आणि एकमेव केंद्र’ ठरले.

१९९८

आमच्या पहिल्या आयव्हीएफ केंद्रासाठी यूएसएच्याडायमंड इन्स्टिट्यूट ऑफ फर्टिलिटी अँड मेनोपॉजसोबत तांत्रिक सहकार्य प्रस्थापित करण्यात आले. या केंद्रात आयव्हीएफ सुविधा सुरू करण्याआधी डॉ. फाल्गुनी बाविशी यांनी डायमंड इन्स्टिट्यूटमधून विस्तृत प्रशिक्षण घेतले.

इनफर्टिलिटी अँड एआरटी फॅसिलिटीअशी विशेषता म्हणूनबाविशी आयव्हीएफ फर्टिलिटी एंडोस्कोपी क्लिनिकस्थापन करण्यात आले. हे क्लिनिक आंतरराष्ट्रीय मानकांनुसार स्थापन करण्यात आले आहे. 

बाविशी आयव्हीएफ क्लिनिकमध्ये आयव्हीएफ सुविधा सुरू करण्याच्या उद्देशाने म्हणून युएसएच्या डायमंड इन्स्टिट्यूटचे सहसंचालक डॉ. मॅटन एमिनी यांनी नोव्हेंबर, १९९८ मध्ये १४ दिवसांसाठी बाविशी क्लिनिकला भेट दिली.

१९९०

व्यवसायाने डॉक्टर असलेल्या या जोडप्याने अहमदाबाद शहराच्या मध्यवर्ती भागात एक प्रसूती गृह स्थापित केले. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत हे केंद्र स्वतःला अद्ययावत करत गेले आणि अजून वृद्धिंगत करत जाण्याचा शोध सुरूच राहीला.

१९८७

बीएफआयच्या संस्थापकांनी अहमदाबादच्या सीमावर्ती भागात अजून एक प्रसूती गृह सुरू केले.

१९८६

बीएफआयचे प्रवर्तक असलेले डॉ. फाल्गुनी डॉ. हिमांशू बाविशी यांनी अहमदाबाद शहराच्या सीमावर्ती भागात आठ खाटांचे एक प्रसूती गृह सुरू केले. या गृहात आधुनिक काळातील सर्वच उपकरणे, जसे की सोनोग्राफी, लॅप्रोस्कोपी, आदींचा समावेश होता.

आमच्या संपर्कात रहा.

आमचे स्थान

    Book an Appointment

    Your family building is just your decision away. Reach us NOW, fill this form and we will respond ASAP, Together, we will succeed.