BFI

Our team at BFI

टीमवर्कमुळे ड्रीमवर्क घडते!

आम्ही अतिशय हुशार कर्मचाऱ्यांना एकत्रित करून पारंगत केले आहे. जर हिऱ्याला चांगल्या पद्धतीने कापले आणि तकाकी दिली गेली, तर तोसुद्धा अधिक प्रखरतेने चमकतो. आमच्या टीमचे ज्ञान व कौशल्ये वृद्धींगत करण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करत असतो. आमची टीम यशासाठी भुकेली, नाविन्यतेसाठी उपाशी, कार्य करण्यासाठी अभिलाषी व एक पाऊल पुढे जाऊन रुग्णांना सेवा प्रदान करण्यासाठी सदैव तयार असते.

बीएफआयमधील आयव्हीएफ समुपदेशकांची टीम म्हणजे दुर्मिळ रत्नांचा संग्रहच’ !

उच्च शिक्षित, अनुभवी व आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले आयव्हीएफ तज्ज्ञ आमच्या टीमला वैशिष्ट्ये प्रदान करतात. या तज्ज्ञ प्रवर्तकांकडे अतिशय कठीण व दुर्मिळ समस्यांच्या प्रकरणांसह हजारो जोडप्यांवर उपचार करण्याचा वैद्यकीय अनुभव आहे. त्यांच्या या अनुभवांमुळे संपूर्ण वैद्यकीय व आयव्हीएफ तज्ज्ञ समुपदेशकांच्या टीमला आधार मिळतो, तसेच शिकण्याच्या अनेक संधी इतरांना प्राप्त होतात. आमच्याकडे भारतातील नामांकित वैद्यकीय महाविद्यालयांतून पदव्युत्तर पदवी प्राप्त व उच्च शिक्षित असलेल्या १४ आयव्हीएफ समुपदेशकांची भक्कम टीम आहे. त्यांनी भारतात तसेच विदेशातही प्रशिक्षण घेतले आहे. त्यांना वंध्यत्व व आयव्हीएफ उपचारांचा अतिशय मुलभूत पातळीपासून सर्वांत प्रगत पातळीपर्यंत, तसेच अतिशय साध्यापासून ते अतिशय क्लिष्ट स्तरावरील अनुभव आहे.

बीएफआयमधील भ्रुणशास्त्रज्ञांची टीम म्हणजे दुर्मिळ अशा शुद्ध मोत्यांचे हार आहे.

बीएफआयच्या संस्थापकसंचालिका डॉ. फाल्गुनी बावीशी ह्या आयव्हीएफ प्रयोगशाळा विज्ञान व तंत्रज्ञानात अतिशय पारंगत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमची योग्य पात्रता असलेली, अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टरांची भ्रुणशास्त्र टीम अतिशय उत्तम कार्य करते. सर्व आयव्हीएफ तंत्रज्ञानात व स्थापित किंवा नव्या तंत्रांमध्ये, तसेच वेळापत्रक व्यवस्थापित करण्याच्या मुख्य कामगिरी निर्देशकांमध्ये उत्कृष्टता साधण्यासाठी आमची टीम वचनबद्ध आहे. आयव्हीएफ प्रयोगशाळा ही संपूर्ण आयव्हीएफ कार्यक्रमाची  हृद्य व आत्मा आहे. आमचे हे हृद्य फक्त मजबूतच नाही, तर ते शुद्धही आहे.

बीएफआयमधील समुपदेशकांची टीम म्हणजे तुम्हाला गरजेच्या वेळी मदत करणारा मित्र आहे.

स्वभावाने कनवाळू असलेली आमची समुपदेशकांची टीम फक्त तुमच्या वैद्यकीय गरजाच समजून घेत नाही, तर तुमच्यातील भय, चिंता, तुमच्या सामाजिक व भावनिक समस्या आणि बऱ्याच बाबी समजून घेते.

  • उपचाराआधी – ते आनंदात तुम्हाला उपचाराचे सर्व पर्याय सखोलपणे समजावून सांगतात आणि त्यांपैकी योग्य उपचाराची निवड करण्यासाठी तुम्हाला मदत करतात.
  • उपचाराच्या वेळी – ते तुम्हाला उपचारातील सगळी प्रगती काळजीपूर्वक समजावून सांगतात आणि समोर काय अपेक्षा बाळगावी हेही सांगतात.
  • उपचारानंतरते तुम्हाला सकारात्मक राहण्यास व अपयशाच्या भीतीवर मात करण्यासाठी मदत करतात.

तुम्हाला चिंतामुक्त करण्यासाठी व आरामदायी अनुभूती देण्यासाठी आमचे समुपदेशक नेहमी तयार असतात. यामुळे तुम्हाला चांगला अनुभव मिळतो व यश प्राप्तीची अनुभूती होते.

बीएफआयची उर्वरित टीम बिग इज ब्युटीफुल!

तुमचा आमच्यासोबतचा फर्टिलिटीचा प्रवास सहज, आरामदायी, आनंददायी व यशस्वी करण्यासाठी आमची उत्साही,  वचनबद्ध, प्रशिक्षित आणि सदैव तयार असणाऱ्या २०० हून अधिक कर्मचाऱ्यांची टीम सर्वतोपरी प्रयत्नरत असते

आमचे स्थान

    Book an Appointment

    Your family building is just your decision away. Reach us NOW, fill this form and we will respond ASAP, Together, we will succeed.