BFI

स्पिंडल व्हिव आयसीएसआय

ज्या रुग्णांमध्ये आयव्हीएफ किंवा आयसीएसआयच्या मदतीने चांगले फलन होत नाही, त्यांना चांगल्या फलनासाठी स्पिंडल व्हिव आयसीएसआय मदत करते. ते अंड्यांच्या गुणवत्तेचे अधिक तपशीलवार विश्लेषणही प्रदान करते.

अंड्यांच्या अंतिम परिपक्वतासाठी अंड्यांमध्ये मेयॉटिक स्पिंडल तयार होते.  चांगले फलन प्राप्त व्हावे यासाठी पारंपारिक आयसीएसआय दरम्यान शुक्राणूंना इंजेक्शन देताना आम्ही स्पिंडलला इजा होऊ देत नाही.

या मेयॉटिक स्पिंडल्सला दृश्यमान करण्यासाठी स्पिंडल व्हिव विशेष पोलराईज्ड मायक्रोस्कोप किंवा पोलस्कोप वापरते.

चांगले गर्भाधान साध्य करण्यासाठी

मेयॉटिक स्पिंडल्सचे व्हिज्युअलायझेशन केल्यामुळे आयसीएसआयसाठी ऊसाइट्सला संरेखित करण्याचा पर्याय देखील मिळू शकतो. पारंपारिक आयसीएसआयमध्ये आम्ही स्पिंडलच्या स्थानासाठी सरोगेट मार्कर म्हणून पोलराईज्ड वस्तूचा उपयोग करतो. काही रुग्णांमध्ये स्पिंडल पोलराईज्ड वस्तूपासून विस्थापन होते आणि यामुळे आयसीएसआयच्या वेळी स्पिंडलला संभाव्य नुकसान होऊ शकते. जर आम्ही पोलस्कोपचा वापर करून स्पिंडल्स संरेखित करू, तर हे नुकसान कमी केले जाऊ शकते. एल्हम आसा इट अल यांनी केलेल्या एका अभ्यासानुसार, स्पिंडल अलाइन्ड ग्रुपमधील फर्टिलायझेशन दर कंट्रोल ग्रूपपेक्षा जास्त होता.

अंड्याच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी

वारंवर वाईट गुणवत्तेचे भ्रुण आढळणाऱ्या रुग्णांमध्ये शुक्राणू किंवा/आणि अंड्याशी संबंधित घटक कारणीभूत असू शकतात. पारंपारिक वीर्य तपासणी व्यतिरिक्त शुक्राणूंच्या घटकांचे मूल्यांकन करण्यासाठी शुक्राणूंचे डीएनए फ्रॅगमेंटेशनसारख्या विविध चाचण्या उपलब्ध आहेत. तथापि, ऊसाइट गुणवत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी मेयॉटिक स्पिंडलचे असणे किंवा नसणे हे उपयुक्त मार्कर ठरू शकते. अंडीच्या गुणवत्तेचे चिन्हक म्हणून स्पिंडलची लांबी आणि स्पिंडल क्षेत्राचाही वापर केला जाऊ शकतो.

Pre-Implantation Genetic Testing

जर एखादे जोडपे जनजपेशी दानाचा विचार करीत असेल, तर ही माहिती रुग्णाला शुक्राणू दानाचा पर्याय निवडावा की अंडदानाचा हे ठरविण्यात मदत करू शकते.

स्पिंडल व्हिव आयसीएसआय कधी मदत करू शकते?

  • आयव्हीएफ किंवा आयसीएसआयसह वाईट फलन दर्शविणार्‍या रूग्णांमध्ये
  • आयव्हीएफसह वाईट दर्जाचे भ्रुण विकसित होणाऱ्या रूग्णांमध्ये
  • चांगले गर्भाधान दर साध्य करण्यासाठी फारच कमी अंडी किंवा एएमएच उपलब्ध असलेल्या रूग्णांमध्ये. 

आमचे स्थान

    Book an Appointment

    Your family building is just your decision away. Reach us NOW, fill this form and we will respond ASAP, Together, we will succeed.