BFI

क्रायोप्रिझर्वेशन – गोठवणे आणि साठवणे

क्रायोप्रिझर्वेशन ही भविष्यातील वापरासाठी जैविक उतींना अत्यंत कमी तापमानावर गोठवण्याच्या प्रक्रीयेसाठी वापरली जाणारी एक वैद्यकीय संज्ञा आहे. सध्याचे तंत्रज्ञान भ्रूण, ब्लास्टोसिस्ट्स, अंडी (ऊसाइट्स), शुक्राणू (वीर्य), अंडकोष ऊती, स्त्रीबीजकोष ऊती इत्यादींसारख्या सर्व प्रकारच्या पुनरुत्पादक ऊतींना अतिशीत करण्यास सक्षम आहे.

भविष्यातील वापरासाठी या ऊतींना अखंडपणे टिकवणे हे या प्रक्रियेचे मुख्य उद्दीष्ट आहे.

ऊतीला196 डिग्री सेल्सिअसपर्यंतच्या तापमानात द्रव नायट्रोजनमध्ये ठेवले जाते. शुण्याखालील या तापमानावर चयापचय क्रिया पूर्णपणे अवरोधित होते आणि ते आयुष्याच्या कोणत्याही कालावधीपर्यंत निलंबित अवस्थेत राहतात. 

अंडी आणि भ्रुणाला गोठवण्याच्या अलिकडील व्हिट्रिफिकेशन तंत्रामुळे क्रायोप्रिझर्वेशनचे परिणाम नाटकीयरित्या सुधारले आहेत. डॉ. तेत्सुनोरी मुकैडा आणि हिरोशिमा एचएआरटी इंस्टिट्यूट जपानच्या टीमने आमच्या कार्यसंघाला प्रशिक्षण दिले आहे. डॉ. मुकैडा हे व्हिट्रिफिकेशन तंत्रांच्या शोधकांपैकी एक आहेत.

बावीशी फर्टिलिटी इंस्टिट्यूटने २००८ मध्ये व्हिट्रीफाइड गोठलेल्या अंड्यांच्या साहाय्याने भारतातील पहिल्या जिवंत बाळाला जन्म दिला. याचा आम्हाला अभिमान आहे. 

तंत्रे

शरीरातील पेशींमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते. त्यांना गोठवताना त्यांच्या अस्तित्वाशी संबंधित समस्या बर्फाच्या कणांवर अवलंबून असते, हे कण वितळल्यानंतर गुणवत्तेवर नकारात्मक परिणाम करू शकतात. ही समस्या भ्रूण किंवा स्त्रीबीजांडसारख्या मोठ्या पेशींमध्ये अधिक असते.

व्हिट्रिफिकेशन – जलद गोठवण

ही एक अतिशय वेगवान गोठवण प्रक्रिया आहे. जलद गोठवण प्रक्रिया बर्फाचे कण तयार होण्यास प्रतिबंध करते आणि द्रवपदार्थांना जेली/काचेसारख्या संरचनेत रुपांतरीत करते. हे वितळल्यानंतर ही प्रक्रिया उत्कृष्ट पुनर्प्राप्ती प्रदान करते. भ्रुण आणि ऊसाइट्ससाठी या प्रक्रियेला प्राधान्य देण्यात येते.

हळूवार गोठवण

या प्रक्रियेत ऊतींचे तापमान हळूहळू कमी केले जाते. अतिशय उच्च तंत्रज्ञानावर आधारित शीतकाद्वारे ही प्रक्रिया नियंत्रित करावी लागते. शुक्राणू, अंडकोष ऊती आणि स्त्रीबीजकोषाच्या  ऊतींसाठी या पद्धतीचा अवलंब केला जातो

फ्रीजिंग व व्हिट्रिफिकेशन तंत्र हे सहाय्यक प्रजनन तंत्रांचे मुलभूत अंग आहे. या तंत्रांमुळे उच्च गुणवत्तेची अंडी, शुक्राणू आणि भ्रूणांचे संवर्धन किंवा क्रायोप्रीझर्व केले जाते.

एम्ब्रियो - ब्लास्टोसिस्ट क्रायोप्रिझर्वेशन

या विशिष्ट गोठण तंत्रज्ञानामुळे ताज्या उपचारांनी मिळणाऱ्या यशाइतकेच यश व्हिट्रीफाईड भ्रुणाद्वारे मिळवणे शक्य होते. जोडप्यांनी पुन्हा संपूर्ण डिम्बग्रंथि उत्तेजन आणि फलन प्रक्रियेतून न जाता त्यांना त्यांचे पालकत्व स्वप्न साकार करण्याची उत्तम संधी यामध्ये आहे. गोठविलेल्या भ्रूण हस्तांतरणाला समान यश दरांसह ताज्या आयव्हीएफ चक्रांच्या तुलनेत एक तृतीयांशपेक्षा कमी खर्च येऊ शकतो.

दहा वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधीपर्यंत भ्रुण/ब्लास्टोसिस्ट्स गोठवून ठेवता येतात.

क्रायोप्रिझर्वेशन – भ्रूण/ब्लास्टोसिस्टचे गोठण केव्हा केले जाते?

ताजे भ्रुण हस्तांतरण झाल्यानंतर आयव्हीएफ सायकलमध्ये जेव्हा अतिरिक्त भ्रुण उरतात.

ओव्हेरियन हायपरस्टिम्युलेशन (ओएचएसएस), एंडोमेट्रियम समस्या किंवा इतर वैद्यकीय स्थितीमुळे जेव्हा नवीन हस्तांतरण शक्य नसते.

जेव्हा जोडप्याला उशिरा गर्भधारणा हवी असेल, परंतु अशाने प्रजनन क्षमता कमी होणार असेल. जसे की, 35 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्रिया, अंडाशयाचा साठा कमी असलेल्या स्त्रियाअंड्यांची संख्या कमी असणे, कर्करोगाच्या उपचारांपूर्वी, अंडाशयाच्या शस्त्रक्रियेपूर्वी इ.

अनेक आयव्हीएफ अपयशी ठरल्यानंतर आयव्हीएफचे परिणाम सुधारण्याच्या योजनेचा भाग म्हणून.

जेव्हा एआरए– एंडोमेट्रियल रिसेप्टीव्हिटी अ‍ॅरे चाचणी ग्रहणक्षम नसते.

२ किंवा त्याहून अधिक आयव्हीएफ सायकल्समध्ये अधिक गर्भाशय भ्रुण जमा करण्यासाठी, हस्तांतरणासाठी किंवा पीजीटी – रोपणपूर्व अनुवांशिक चाचणी सायकल पूर्ण करण्यासाठी आवश्यक भ्रुणांची संख्या पुरेशी असण्यासाठी रुग्णांच्या स्त्रीबीजकोषांचा कमी प्रतिसाद.

अंडकोष साठा कमी असणाऱ्या रुग्णाला इष्टतम यश मिळवून देण्यासाठीच्या डुओस्टीम- या दुहेरी उत्तेजन सायकलचा भाग म्हणून.

ऊसाइट्स क्रायोप्रिझर्वेशन – अंडी गोठवणारे व्हिट्रिफिकेशन

तुमची जननक्षमता तुमच्या नियंत्रणात आहे.

ज्या स्त्रियांना आपले मातृत्व पुढे ढकलण्याची इच्छा आहे आणि ज्यांना पुरुष भागीदार नाही किंवा ज्या भ्रूण तयार करू इच्छित नाहीत, अशांसाठी अंडी गोठवणे हा एकमेव पर्याय आहे. 

ऊसाइट्सच्या व्हिट्रिफिकेशनचे उद्दीष्ट त्यांना अशाप्रकारे गोठविणे आहे, ज्यामुळे एखाद्या स्त्रीची पुनरुत्पादक क्षमता पाहिजे तितक्या लांबणीवर ढकलली जाऊ शकते. यामुळे, अंडी व्हिट्रीफाय करताना गर्भवती होण्याच्या जितक्या शक्यता असतात, तितक्याच शक्यता नंतरच्या काळातही टिकवून ठेवणे शक्य होते.

बावीशी फर्टिलिटी इंस्टिट्यूटने व्हिट्रीफाइड गोठलेल्या अंड्यांच्या साहाय्याने भारतातील पहिल्या जिवंत बाळाला जन्म दिल्याचा आम्हाला अभिमान आहे.

या प्रयोगशाळा तंत्राचे संकेत ज्या स्त्रियांना मातृत्व पुढे ढकलायचे आहे किंवा ज्यांच्या अंडकोषाच्या कार्यामध्ये घट होण्याचा धोका आहे, अशा महिलांची प्रजनन क्षमता संरक्षित करण्यासाठी आहेत.

क्रायोप्रिझर्वेशन – अंडी गोठवण कधी केले जाते?

  • आपले मातृत्व वयाच्या पस्तीशी पलीकडे ढकलू इच्छित असलेली स्त्री. 
  • उशिरा मातृत्व प्राप्त करू इच्छित असणाऱ्या स्त्रीच्या अंडकोषाची कमी झालेली कार्यक्षमता. जर तुम्हाला नियमित पाळी येत असेल आणि तुम्ही मातृत्व लांबणीवर टाकू इच्छित असाल, तर अशावेळी तुमच्या डिम्बग्रंथिच्या कार्याची तपासणी करणे चांगली ठरेल.
  • केमो किंवा रेडिओथेरपी घेण्यापूर्वीचे कर्करोगाचे रुग्ण; सोबतच ज्यांना अस्थिमज्जा प्रत्यारोपणाची आवश्यकता आहे.
  • अंडाशयाला घातक ठरणारे उपचार घेणार असतील, असे कर्करोग नसलेले रुग्ण.
  • प्रगत एंडोमेट्रिओसिससाठी किंवा अंडाशयाशी संबंधित मोठी शस्त्रक्रिया करणाऱ्या असणाऱ्या स्त्रिया, कारण अशा शस्त्रक्रिया अंडाशयाचे कार्य मोठ्या प्रमाणात कमी करू शकतात
  • ऊसाइट्सचे फलन आणि/किंवा गर्भधारणा पुढे ढकलण्याचे हेतू असणारे इतर अनेक आणि विविध संकेत.
  • गोठवलेल्या अंड्यांना प्रयोगशाळेत वितळवून त्याचे फलन केले जाऊ शकते.

एकदा भ्रुण तयार झाल्यानंतर त्यांचे रोपण करण्यासाठी त्यांना गर्भाशयात हस्तांतरित केले जातते.

क्रायोप्रिझर्वेशन कसे केले जाते – अंडी कशी गोठवली जातात? – प्रक्रिया

ही प्रक्रिया अंडी पुनर्प्राप्तीच्या टप्प्यापर्यंत पारंपारिक आयव्हीएफ प्रमाणेच असते. या प्रक्रियेतील पहिली पायरी म्हणजे, अधिक अंडी तयार करण्यासाठी गोनाडोट्रोपिन हार्मोन्ससह (एफएसएच आणि/किंवा एचएमजी) उत्तेजन देणे. एकदा पुटक योग्य आकाराचे झाले, की मग स्त्रीबीजाडांची पुनर्प्राप्ती केली जाते. ही अतिशय छोटी प्रक्रिया असून, सौम्य भूल देऊन पार पाडली जाते. याअंतर्गत, योनीमार्गे एक सुई टाकून सोनोग्राफीच्या मार्गदर्शनाद्वारे अंड्यांना एस्पायर केले जाते. त्यानंतर परिपक्वतेसाठी या अंड्यांची तपासणी केली जाते; पारंपारिक आयव्हीएफमध्ये, परिपक्व अंड्यांचे फलन केले जाते. परंतु, इथे परिपक्व अंडी व्हिट्रिफिकेशनद्वारे गोठविली जातात. प्रत्यक्ष वापराच्या वेळी ही अंडी वितळविली जातात (गरम किंवा पुन्हा जिवंत केली जातात) आणि नेहमीसारख्या आयव्हीएफ-आयसीएसआय उपचारांप्रमाणेच त्यांचे फलन केले जाते.

रुग्णाला जेव्हापर्यंत वाटेल, तेव्हापर्यंत ऊसाइट्स गोठवून संवर्धित केली जाऊ शकतात, यासाठी कालमर्यादेचे कोणतेही बंधन नाही.

वीर्य- शुक्राणू क्रायोप्रिझर्वेशन- वीर्य गोठण

वीर्याला गोठवून ठेवण्यासाठी वीर्य गोठण अतिशय सोपी, परवडणारी आणि प्रभावी पद्धती आहे.

क्रायोप्रिझर्वेशन – वीर्य कधी गोठवले जाते? – संकेत

  • ज्यादिवशी वीर्याची गरज आहे, त्यादिवशी जर पती अनुपस्थित असणार असेल तर
  • प्रवासाशी संबंधित नोकरी, लष्करी सेवा, विदेशात राहणे, इत्यादी. 
  • पती मागणीनुसार वीर्य देऊ शकत नसेल 
  • चांगल्या शुक्राणूंच्या उपलब्धतेसाठी आयव्हीएफ उपचारापूर्वी 
  • शुक्राणूंची संख्या अत्यंत कमी असलेले पुरुष, कारण अशा पुरुषांमध्ये भविष्यकाळात शुक्राणूंची संख्या अजूनच कमी होण्याची शक्यता असते. 
  • टेस्टिस किंवा एपिडिडिमिसपासून बायोप्सीद्वारे गोळा केलेले शुक्राणू
  • केमो किंवा रेडिओथेरपी घेण्यापूर्वीचे कर्करोगाचे रुग्ण; सोबतच ज्यांना अस्थिमज्जा प्रत्यारोपणाची आवश्यकता आहे.
  • शुक्राणूंना घातक ठरणारे उपचार घेणार असतील, असे कर्करोग नसलेले रुग्ण.
  • शुक्राणू दान. दात्याचे वीर्य गोठवले जाते आणि वीर्य बँकेत – एआरटी बँकेत तयार ठेवले जाते. यामुळे कोणत्याही वेळी चांगल्या प्रतीच्या शुक्राणूंचा विपुल प्रमाणात पुरवठा सुनिश्चित करता येतो.

गोठलेल्या शुक्राणूंचा वापर केल्याने आयव्हीएफच्या निकालांवर परिणाम होत नाही. जर आपण  आययूआयसाठी गोठवलेल्या शुक्राणूंचा वापर करत असू, तर उपचाराच्या यश दरात किरकोळ कपात होणे अपेक्षित आहे.

अंडी, गर्भ, ब्लास्टोसिस्ट्स, शुक्राणू, अंडकोष ऊती आणि गर्भाशयाच्या ऊतींना गोठवणे, हे एक परिष्कृतसिद्ध विज्ञान आहे. यामुळे आयव्हीएफ उपचारांच्या नवीन शक्यता निर्माण झाल्या आहेत आणि यशाचे प्रमाणही सुधारले आहे.

बाविशी फर्टिलिटी इन्स्टिट्यूटचा फायदा

आमच्याकडे एक मजबूत फ्रीझिंग प्रोग्राम आहे. प्रत्येक महत्वाची, नाजूक आणि संवेदनशील जैविक सामग्रीची अत्यंत काळजी घेतली जाते. नवीन पिढीतील व्हिट्रीफिकेशन तंत्रज्ञानाचा वापर करून गोठवलेल्या अंड्यांसह भारतात पहिल्या जिवंत बाळाला जन्म देण्याचे श्रेय बीएफआयला जाते.

आमचे स्थान

    Book an Appointment

    Your family building is just your decision away. Reach us NOW, fill this form and we will respond ASAP, Together, we will succeed.